Cold Weather Agrowon
हवामान

Winter Update : विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता

Weather Update : उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असल्याने महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.

अमोल कुटे

Pune News : उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असल्याने महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. सोमवारी (ता. १८) राज्याच्या अनेक भागात गारठा कायम होता. नाशिकच्या निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १८) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगडमध्ये अनेक भागांत किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे.

पंजाबमध्ये दाट धुके पाहायला मिळत आहे. राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी कायम आहे. तर सायंकाळनंतर जोरदार थंड वारे वाहत असल्याने गारठा आणखी वाढत आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा अधिक असून, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वरच आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची, तसेच विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २७.३ (१४.५), जळगाव २८.० (१४.४), कोल्हापूर २६.१ (१९.१), महाबळेश्वर २३.९ (१३.५), नाशिक २६.३ (१४.२), निफाड २८.० (११.४), सांगली २६.२ (१८.९), सातारा २७.९ (१८.५), सोलापूर २८.९(१९.८), सांताक्रूझ ३३.२ (२३.६), डहाणू ३१.४ (२०.८), रत्नागिरी ३३.५ (२५.६),

छत्रपती संभाजीनगर २७.० (१५.४), नांदेड - (१७.२), परभणी २७.५ (१५.९), अकोला २९.२ (१५.३), अमरावती २७.४ (१४.९), बुलडाणा २६.८ (१४.०), ब्रह्मपुरी ३०.० (१३.६), चंद्रपूर २८.६(१३.०), गडचिरोली २८.८ (१२.०), गोंदिया २६.४ (१२.५), नागपूर २७.६(१२.८), वर्धा २८.०(१३.६), वाशीम २७.८ (१२.८), यवतमाळ २९.० (१३.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT