Cold Weather Agrowon
हवामान

Weather Update : परभणीत ९.६ अंश तापमानाची नोंद

Cold Weather : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानाशास्त्र विभागाच्या वेधशाळेत सोमवारी (ता. २५) सकाळी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानाशास्त्र विभागाच्या वेधशाळेत सोमवारी (ता. २५) सकाळी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमानाचा पारा १० अंश सेल्शिअसच्या खाली घसरला आहे.

सोमवारी सामान्य किमान तापमान (१२.८ अंश सेल्सिअस) आणि प्रत्यक्ष किमान तापमान (९.६ अंश) यांच्यात ३.२ अंशांचा फरक आहे. कमाल २८ अंश तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यापासून परभणी जिल्ह्यातील किमान (रात्रीच्या) आणि कमाल (दिवसाचे) तापमानात किंचित घट, किंचित वाढ सुरू आहे.

सोमवारी (ता. १८) किमान तापमान ११.३ अंश तर कमाल तापमान ३०.८ अंश होते. मंगळवारी (ता. १९) किमान तापमान ११.६ अंश तर कमाल तापमान २९.६ अंश, बुधवारी (ता. २०) किमान १०.५ अंश तर कमाल २९.५ अंश तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. २१) किमान तापमान ११ अंश तर कमाल तापमान २८.५ अंश होते. शुक्रवारी (ता. २२) किमान ११.७ अंश तर कमाल २९.२ अंश तापमानाची नोंद झाली. शनिवारी (ता. २३) किमान तापमान १२ अंश तर कमाल तापमान २८.५ अंश होते. रविवारी (ता. २४) किमान १०.६ अंश तर कमाल २९.२ अंश तापमानाची नोंद झाली.

येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सकाळी दव पडत आहे. गहू, हरभरा, करडई तसेच आंबा बहरासाठी पोषक वातावरण आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT