Rain Alert Agrowon
हवामान

Hailstorm Alert : मराठवाडा, विदर्भात पाऊस, गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट'

राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने तडाखा दिला आहे. आज (ता. २८) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्याच्या विविध भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने (Hailstorm) तडाखा दिला आहे. आज (ता. २८) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिम विदर्भात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील प्रणालीत विरून गेली आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा दणका सुरूच आहे. आज (ता. २८) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामान यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. गुरूवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरूवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.७ (२१.२), जळगाव ३९.६ (२३.३), कोल्हापूर ३५.२ (२२.७), महाबळेश्वर २९.१ (१७.१), नाशिक ३६.७(२१.२),

निफाड ३७.४ (२०.१), सांगली ३६.४ (२२.४), सातारा ३६.३ (२०.६), सोलापूर ३८.२ (२४.२), सांताक्रूझ ३३.३ (२५.२), डहाणू ३६.२ (२४.४), रत्नागिरी ३३.१ (२४.२),

छत्रपती संभाजीनगर ३५.६ (२०.६), नांदेड ३७.४ (२१.६), परभणी ३८.३ (२१.०), अकोला ३७.० (२०.३), अमरावती ३५.४(१८.१), बुलढाणा ३४.८ (१९.३), ब्रह्मपूरी ३७.० (२०.०),

चंद्रपूर ३६.२ (१९.६), गडचिरोली ३५.२(२०.०), गोंदिया ३४.६ (२२.१), नागपूर ३३.९ (१९.४), वर्धा ३५.२(१८.६), यवतमाळ ३६.० (१६.५).

जोरदार पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT