Hailstorm Agrowon
हवामान

Hailstorm Orange Alert : विदर्भात पाऊस, गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट'

राज्यात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने सत्र सुरूच आहे. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात वादळी वारे, पाऊस, गारपिटीने (Hailstorm) सत्र सुरूच आहे. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, अरबी समुद्र ते मालदीव पर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती विस्तारली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरूच आहे.

आज (ता. २९) विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामान यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा माभ कायम आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३८ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.६ (२१.४), जळगाव ३७.७ (२३.३), कोल्हापूर ३५.४ (२३.८), महाबळेश्वर ३०.९ (१९.०), नाशिक ३५.८(२२.६),

निफाड ३८.२ (२१.४), सांगली ३७.१ (२४.०), सातारा ३६.७ (२०.४), सोलापूर ३९.० (२२.४), सांताक्रूझ ३३.२ (२५.६), डहाणू ३२.८ (२४.१), रत्नागिरी ३३.५ (२४.८),

छत्रपती संभाजीनगर ३६.१ (२०.४), नांदेड ३४.६ (२१.४), धाराशिव ३६.१ (१९.०), परभणी ३५.४ (२२.६), अकोला ३५.८ (२१.४), अमरावती ३५.४(१९.१), बुलढाणा ३५.० (२०.५), ब्रह्मपूरी ३७.२ (१९.९),

चंद्रपूर ३६.८ (२१.४), गडचिरोली ३४.०(२२.२), गोंदिया ३५.५ (२०.५), नागपूर ३३.६ (१९.०), वर्धा ३३.२(१९.४), यवतमाळ ३४.५ (१७.५).

जोरदार पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

विदर्भ : अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर.

मराठवाडा : जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT