Rain Agrowon
हवामान

Konkan Weather Update : कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

Konkan Rain News : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update 2023 : पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने मॉन्सून दमदार कोसळत आहे. आज (ता. २०) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या फालोदी, कोटा, शेवणी, रायपूर, पुरी ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातही दमदार पावसासह अतिवृष्टी झाली आहे. आज (ता. २०) पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा.


बुधवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण :
माथेरान ३४०, कर्जत २५०, पेण २३०, पोलादपूर २२०, खालापूर २१०, महाड १९०, सावंतवाडी, सुधागड पाली, उरण प्रत्येकी १७०, कल्याण, चिपळूण प्रत्येकी १६०, देवगड, लांजा, खेड, वाकवली, मुलदे प्रत्येकी १५०, कणकवली १४०, कुडाळ, दोडामार्ग, माणगाव प्रत्येकी १३०, दापोली १२०, अलिबाग प्रत्येकी १२०, पनवेल, वैभववाडी, मंडणगड, मालवण, ठाणे, पालघर प्रत्येकी ११०, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, कुलाबा, उल्हासनगर, तळा, म्हसळा प्रत्येकी १००, म्हसळा, हर्णे, राजापूर प्रत्येकी ९०, वसई, संगमेश्वर प्रत्येकी ८०.

मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर २८०, लोणावळा २१०, गगनबावडा १४०, चंदगड ९०, आजरा, राधानगरी, शाहूवाडी प्रत्येकी ८०, पाटण, जामखेड प्रत्येकी ६०, वेल्हे, कर्जत, पन्हाळा प्रत्येकी ५०.

मराठवाडा :
धर्माबाद ८०, भोकर, नांदेड, उमरगा, बिलोली, अर्धापूर, भूम, नांदेड, परभणी, हदगाव प्रत्येकी ७०, मंठा, वाशी, किनवट प्रत्येकी ६०, पातूर, पाथरी, सेलू, आष्टी, कंधार, नायगाव, खैरगाव, हिंगोली, मानवत, वसमत, जळकोट, तुळजापूर प्रत्येकी ५०.

विदर्भ :
चंद्रपूर २४०, बल्लारपूर १५०, माणगाव १४०, चामोर्शी, पोंभुर्णा प्रत्येकी ११०, तेल्हारा, वणी, वरोरा प्रत्येकी १००, राळेगाव, शेगाव, सावळी, पांढरीकवडा, मूल, जळगाव जामोद प्रत्येकी ९०, मंगरूळ पीर, संग्रामपूर प्रत्येकी ८०, मलकापूर, झारी झामणी, मुलचेरा, गोंडपिंपरी, भंडारा प्रत्येकी ७०.

घाटमाथा :
घाटमाथा : ताम्हिणी ३३०, दावडी ३२०, डुंगरवाडी ३००, कोयना (पोफळी) खोपोली २७०, लोणावळा, अंबोणे प्रत्येकी २३०, शिरगाव, वळवण, भिरा प्रत्येकी २१०, खंद १६०, शिरोटा, भिवपूरी प्रत्येकी १३०, कोयना १००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT