Rain Alert Agrowon
हवामान

Monsoon Rain: राज्यातील ६ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; विदर्भात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम

Orange Alert: राज्यात पावसाने जोर धरलेला असून हवामान विभागाने ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात पाऊस हेजरी लावत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचीही नोंद झाली. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज ६ जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरवती तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच आज कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नंदरबार, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या कोकणातील आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

रविवारी आणि सोमवारी कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT