Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Paus Andaj : राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Weather Update : हवामान विभागाने राज्यातील ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील वेगवेगळ्या भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होत आहे. हवामान विभागाने राज्यातील ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट दिला. 

हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा आज आणि उद्या अंदाज दिला. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगाटासह तसेच जोरादार वाऱ्यासह पावसाचा आणि गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या म्हणजेच शनिवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदीया, तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर वाशीम आणि यवतमाल जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT