Heat Wave  Agrowon
हवामान

Vidarbha Weather Update : उन्हाच्या चटक्याने विदर्भ भाजला

Vidarbha Heat Wave Update : राज्याच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. ‘ऑक्टोबर हिट’चा चटका वाढल्याने विदर्भ भाजून निघत आहे.

अमोल कुटे

Vidarbha News : राज्याच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. ‘ऑक्टोबर हिट’चा चटका वाढल्याने विदर्भ भाजून निघत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाचा ताप वाढला आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत, तसेच रायलसीमापासून दक्षिण तमीळनाडू लगतच्या कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

यातच राज्यात निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्य प्रकाश यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा पस्तिशी पार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे होते. ब्रह्मपुरीसह अकोला, वर्धा येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले होते. आज (ता. १०) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ः ३४.१, जळगाव ः ३५.६, कोल्हापूर ः ३२.६, महाबळेश्वर ः २८.४, नाशिक ः ३३.८, सांगली ः ३३.८, सातारा ः ३३.७, सोलापूर ः ३५.२, सांताक्रूझ ः ३२.७, डहाणू ः ३२.५, रत्नागिरी ः ३२.२, छत्रपती संभाजीनगर ः ३३.६, नांदेड ः ३५.०, परभणी ः ३५.६, अकोला ः ३६.९, अमरावती ः ३५.६, बुलडाणा ः ३३.४, ब्रह्मपुरी ः ३७.१, चंद्रपूर ः ३५.२, गडचिरोली ः ३४.८, गोंदिया ः ३५.१, नागपूर ः ३५.५, वर्धा ः ३६.०, वाशीम ः ३४.४, यवतमाळ ः ३५.५.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.१, अकोला ३६.९, वर्धा ३६.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT