Monsoon Update Agrown
हवामान

Monsoon Rain Update: माॅन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’च; राज्यात पावसाचा जोर ५ दिवसांपासून कमीच

Monsoon Forecast: राज्यात माॅन्सूनची वाटचाल मागील ६ दिवसांपासून स्थिर आहे. त्यामुळे बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी असून पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नाही. त्यामुळे माॅन्सून गेल्या ६ दिवसांपासून एकाच भागात मुक्कामावर आहे. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात माॅन्सून गेल्या ६ दिवसांपासून एकाच भागत आहे. माॅन्सूनचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे माॅन्सूनमध्ये प्रगती नाही. माॅन्सून राज्यात मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोचला आहे. त्यानंतर माॅन्सून पुढे सरकलाच नाही.

माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनची वाटचाल कधी सुरु होईल, याविषयी हवामान विभागाने माहीती दिलेली नाही.

माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला. मागील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. जोरदार सर्वदूर पावसाचीन नोंद झाली नाही. असे असले तरी राज्यात पुढील ५ दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्यात काही ठिकाणी मात्र जोरदार सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT