Monsoon Update  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनची दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशात प्रगती

Monsoon Rain Update : अरबी समुद्रातून प्रवाह वेगवान झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे.

अमोल कुटे

Pune News : अरबी समुद्रातून प्रवाह वेगवान झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे.

केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला मॉन्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमुह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजी आगमन केल्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच (ता. ३०) मॉन्सून डेरेदाखल झाला. त्यानंतर उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची प्रगती सुरूच होती.

रविवारी (ता.२) मॉन्सूनने अरबी समुद्रातून वाटचाल सुरू केली. संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगलूरू, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे.

पुढील वाटचालीस पोषक हवामान

पुढील दोन दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा आणखी काही भाग, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT