Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: देशातील १७ राज्यांना माॅन्सून चांगली साथ देणार: १० राज्यांची चिंता वाढणार

Monsoon Prediction: २०२५ चा माॅन्सून हंगाम देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि अन्य राज्यांना चांगली पावसाळी साथ मिळणार आहे, परंतु ईशान्य भारत आणि तमिळनाडू राज्यांमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशात यंदा सरासरी माॅन्सून चांगला बरसणार आहे. देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. देशात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. तर ईशान्य भारत आणि तमिळनाडू राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडणार

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, पश्चिम बंगाल, उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर जवळपास १० राज्यांमध्ये माॅन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यात आहे.

महाराष्ट्रात चांगला पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शक्यता अधिक आहे. विदर्भालगचे जिल्हे वगळता मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे. तर खानदेशातील काही भागातही सरारीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कोकणातही यंदा चांगला पावसाळा राहणार आहे. किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदा तीन वातावरणीय घडामोडी माॅन्सूनला पोषक असल्याने देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

  • प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके म्हणजेच तस्थ आहे. हे तटस्थ तापमान म्हणजेच एन्सो स्थितीचा माॅन्सूनवर फारसा परिणाम होत नाही.

  • म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाचा फरक जास्त नसेल म्हणजेच आयओडी तटस्थ असेल. तटस्थ आयओडीचा माॅन्सूनवर जास्त फरक पडत नाही. ३. डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यांमध्ये उत्तर गोलार्धात युरेशियामध्ये हीम आच्छादनाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी आहे. ही परिस्थिती माॅन्सूसाठी पोषक आहे. यामुळे देशात माॅन्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी आज (ता.१५) देशातील माॅन्सून हंगाम २०२५ म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधितील माॅन्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजात देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला. देशात १९७१ ते २०२० या काळात माॅन्सूनमध्ये सरासरी ८७ सेंटीमिटर पाऊस पडला होता. या सरारीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता २०२५ च्या माॅन्सून हंगामात आहे. देशात सरासरी अधिक पावसाच्या अंदाजाची शक्यता ५९ टक्के आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT