Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Alert: माॅन्सूनचा आज मुक्काम; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: माॅन्सूनची वाटचाल आज रखडली होती. माॅन्सून काल प्रगती केलेल्या भागात होता. राज्यात मात्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनची वाटचाल आज रखडली होती. माॅन्सून काल प्रगती केलेल्या भागात होता. राज्यात मात्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

माॅन्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला. माॅन्सून काल मुंबई, पुणे आणि सोलापूर भागात पोचला होता. आजही माॅन्सून त्याच भागात होता. माॅन्सून कर्नाटकात बंगळूरुपर्यंत, तेलंगणात मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशात कावली पर्यंत पोचलेला आहे. ईशान भारतातही माॅन्सून कालच्याच भागात होता. माॅन्सूनची सिमा आजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर तर कर्नाटकातील कलबुर्गी तसेच तेलंगणातील मेहबुबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावली भागात कायम होती.

माॅन्सनने आज कालच्याच भागात मुक्काम केला असला तरी माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल. माॅन्सून कर्नाटकचा उरलेला भागही व्यापेल तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती करेल. बंगालच्या उपसागरचा उरलेला भाग, ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमच्या काही भागात पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यातही आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच रायगड, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला होता.

उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही पावसाची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT