Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Update: माॅन्सून ३ दिवसांत देश व्यापणार; राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज

Heavy Rain Alert: राज्यात मागील २४ तासांपासून पावसाने हजेरी लावली असून कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ३-४ दिवसांत देशभर माॅन्सून पसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर आज आणि उद्याही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. माॅन्सूने आजही आणखी पुढे चाल करत काही भाग व्यापला आहे. माॅन्सून ३ ते ४ दिवसांत संपूर्ण देश व्यापेल, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. तर पुढील ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. नाशिक आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. 

उद्यापासून पुढील ४ दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. मात्र सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठीही पोषक हवामान होते. त्यामुळे माॅन्सूनने आज पंजाब, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनची सिमा आज जैसलमेर, बिकानेर, झूनझूनू, भारतपूर, रामपूर, सोनिपत आणि अनुपनगर भागात होती. माॅन्सून पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT