Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : मुंबई, अलिबाग, पुणे, परभणी, नागपूरमधून मॉन्सून परतला

Latest Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीची वाटचाल वेगाने सुरू केली आहे. शुक्रवारी (ता. ६) जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे.

Team Agrowon

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीची वाटचाल वेगाने सुरू केली आहे. शुक्रवारी (ता. ६) जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे. मुंबईसह अलिबाग, पुणे, परभणी आणि नागपूरपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या संपूर्ण भागातून मॉन्सून परतला आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मॉन्सूनची परतीची सीमा लखनौ, सतना, नागपूर परभणी, पुणे अलिबागपर्यंत पोहोचली आहे.

दोन ते तीन दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशसह, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

चार दिवस अगोदरच निम्म्या महाराष्ट्रातून परतला

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

शुक्रवारी (ता. ६) सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदरच मॉन्सून जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून परतला आहे. साधारणतः वेळेनुसार ५ ऑक्टोबर रोजी मॉन्सून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांतून, तर १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांशी भागातून माघार घेतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT