Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Return : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; नैर्ऋत्य राजस्थानमधून घेतली माघार

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Dhananjay Sanap


पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैर्ऋत्य राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकणात वीजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशीराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशीराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.  

वायव्य भारतात ८५० हेप्टापास्कल उंची व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र (ॲण्टी सायक्लोन) तयार झाले आहे. नैर्ऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तसेच या भागात आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन हवामान कोरडे झाले आहे. या पूरक स्थितीमुळे नैर्ऋत्य राजस्थानमधून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नौखरा, जोधपूर, बारमेर पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतल्याने हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदाही तब्बल आठ दिवसाने (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरूवात केली आहे. २ जूलै रोजी संपूर्ण देशात पोचलेल्या मॉन्सूनने २ महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोचला होता.

वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल
वर्ष---तारीख
२०१८---२९ सप्टेंबर
२०१९---९ ऑक्टोबर
२०२०---२८ सप्टेंबर
२०२१---६ ऑक्टोबर
२०२२---२० सप्टेंबर
२०२३---२५ सप्टेंबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT