Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon: मॉन्सूनची मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशीवपर्यंत धाव

Early Monsoon Update: यंदाचा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा आगमन वेगाने होत असून मुंबई, पुणे येथे १६ दिवस आधीच पोचल्याने इतिहास घडला आहे. गेल्या ७५ वर्षांत एवढ्या लवकर मॉन्सून दाखल झाल्याची ही पहिली वेळ आहे.

अमोल कुटे

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) आगमनाचा प्रवास यंदा ऐतिहासिक वेगाने सुरू आहे. केरळ, महाराष्ट्रात विक्रमी वेळेत दाखल होणाऱ्या मॉन्सूनने सोमवारी (ता.२६) तिसऱ्याच दिवशी मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत धाव घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेल्या ७५ वर्षांत मॉन्सूनचे लवकर मुंबईत आगमन होण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.

शनिवारी (ता. २४) मॉन्सून केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला. रविवारी (ता. २५) मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक धडक दिली. त्यानंतर सोमवारी (ता.२६) मॉन्सूनने आणखी चाल केली आहे. मुंबईसह पुण्यात मॉन्सून साधारणतः ११ जूनपर्यंत पोचतो.

यंदा मात्र १६ दिवस आधीच मॉन्सूनने हजेरी लावली आहे. यंदा मॉन्सूनचे मुंबईतील सर्वात वेगवान आगमन ठरले आहे. यापूर्वी १९५९, १९६२ आणि १९७१ मध्ये मॉन्सून २९ मे रोजी मुंबईत डेरेदाखल झाला होता. पुण्यात १९६२ मध्ये २९ मे रोजी मॉन्सून दाखल झाला होता. यंदा मुंबई, पुण्यात २६ मे रोजीच मॉन्सून पोचला आहे.

सोमवारी (ता. २६) मॉन्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह, मुंबई, कर्नाटकातील बंगळुरू, तमिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, तसेच पूर्वोत्तर भारतातील मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेशच्या संपूर्ण भागासह आसाम मेघालयाच्या काही भागात प्रगती केली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिव, कलबुर्गी, महबूबनगर, कावली ते आगरतळा, गोपाळपूरपर्यंत होती.

वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटकच्या उर्वरित भागासह, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भाग, तसेच सिक्कीम, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Onion Raid: ‘नाफेड,’ ‘एनसीसीएफ’च्या कांदासाठा तपासणीसाठी धाडी

Ginger Price: आले दरात सात हजार रुपयांपर्यंत सुधारणा

Nafed Onion Procurement: अवसायनात गेलेल्या कांदा खरेदी करणाऱ्या संस्थेवरील कारवाईस स्थगिती

Agriculture University Recruitment: कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी

Horticulture Scheme: फलोत्पादन प्रकल्पासाठी २५ कोटींपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT