Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनची वाटचाल होणार

Monsoon Latest News : बुधवारपर्यंत (ता.२१) दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारतात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम परिणाम झाला. गेल्या रविवारी (ता. ११) कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोचल्यानंतर आठवडाभरापासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) महाराष्ट्रातील वाटचाल थांबली आहे. मात्र अडखळलेली वाटचाल पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारपर्यंत (ता.२१) दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारतात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. याच दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाने मॉन्सूनचे प्रवाह खेचून आणल्याने पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनची वेगाने प्रगती झाली. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला. सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात प्रगती केली.

दरम्यान, चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच, मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले. तसेच समुद्रावरील बाष्प वादळाने खेचून नेले. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन लांबण्याबरोबरच पूर्वमोसमी पावसानेही दडी मारली.

पाऊस लांबल्याने पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. मात्र मॉन्सूनच्या वाटचालीस पुन्हा पोषक हवामान होत आहे. बुधवारपर्यंत दक्षिण द्वीपकल्पासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्याच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- मॉन्सूनच्या वाटचालीस होतेय पुन्हा पोषक हवामान

- बुधवारपर्यंत पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्याच्या काही भागात प्रगती होण्याची शक्यता

चक्रीवादळ आज विरून जाण्याची शक्यता

‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री गुजरातच्या किनाऱ्याला धडकले. जमिनीवर येताच वादळाची तीव्रता ओसरत आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) कायम आहे. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. १९) विरून जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT