Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सूनची महाराष्ट्रात मुसंडी

Weather Update : जोरदार पावसाच्या सुखसरींसह मॉन्सून एक्सप्रेस मोठ्या दिमाखात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गुरूवारी (ता. ६) नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये मजल मारली आहे.

Team Agrowon

Pune News : जोरदार पावसाच्या सुखसरींसह मॉन्सून एक्सप्रेस मोठ्या दिमाखात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गुरूवारी (ता. ६) नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये मजल मारली आहे.

यंदा चार दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग अधिक बळकट होत असल्याने मोसमी वारे भारत भूमीवर प्रवास करत आहेत. केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर वेग धरलेल्या मॉन्सूनने मंगळवारी (ता. ४) सर्वसाधारण वेळेच्या एक दिवस आधीच गोव्यासह, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली होती.

त्यानंतर गुरूवारी (ता. ६) मॉन्सूनने गोव्याचा उर्वरित भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणाच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात प्रगती केली. महाराष्ट्रातील संपुर्ण सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह रत्नागिरी आणि सातारा, सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केली आहे.

चार दिवस आधीच दाखल

यंदा तळ कोकणसह महाराष्ट्रात साधारणात: चार दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत उर्वरित कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, छत्तीसगड, दक्षिण ओडिशाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT