Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सून एक्सप्रेस अखेर विदर्भात दाखल!

Maharashtra Monsoon Update : कोकणच्या काही भागात माॅन्सून दाखल झाल्यानंतर तब्बल १२ दिवस राज्यातील वाटचाल अडखळली होती. अखेर आज माॅन्सूनने पूर्व विदर्भात प्रगती केली.

Team Agrowon

Monsoon Update News : कोकणच्या काही भागात माॅन्सून दाखल झाल्यानंतर तब्बल १२ दिवस राज्यातील वाटचाल अडखळली होती. अखेर आज माॅन्सूनने पूर्व विदर्भात प्रगती केली. त्यासोबत इतर काही राज्यांमध्ये आज माॅन्सून पुढे सरकला.

माॅन्सूनने काल तेलंगणाच्या भागात, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, ओडिशाचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग, पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात तसेच झारखंड आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली होती.

महाराष्ट्रात मात्र माॅन्सूनचा प्रवास थबकलेलाच होता. महाराष्ट्रात माॅन्सूनची दिशा रत्नागिरी भागातच होती. पण आज माॅन्सूनने विदर्भात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. असं असलं तरी पेरणीयोग्य पाऊस झालेलना नाही.

आज माॅन्सूनने पूर्व विदर्भात प्रवेश केला. यासोबत माॅन्सून राज्याच्या दुसऱ्या भागात दाखल झाला. तसेच माॅन्सूनने आज कर्नाटकातील आणि तेलंगणातील आणखी काही भाग, उर्वरित आंध्र प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागात तसेच बंगालच्या उपसाराचा वायव्येचा उर्वरित भाग, ओडिशा आणि दक्षिम पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग माॅन्सूनने आज व्यापला.

माॅन्सून आज पूर्व विदर्भात दाखल झाला. माॅन्सूनची आज देशातील सिमा रत्नागिरी, बिजापूर, निजामाबाद, दुर्ग, दौलतगंज, बक्सर आणि सिध्दार्थनगर भागात होती. माॅन्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आणखी वाटचाल करेल, त्यासाठी पोषक हवामान आहे.

महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागात माॅन्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये प्रगती करेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

तसेच पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून छत्तीसगडचा आणखी काही भाग, झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग, पूर्व मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्ये माॅन्सून प्रगती करण्यास पोषक वातावरण आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT