Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon 2025: माॅन्सून सोलापूर, पुणे, मुंबईत दाखल; ३ दिवसात आणखी पुढे सरकणार

Monsoon Forecast: माॅन्सूनची देशातील वाटचाल वेगाने सुरु आहे. माॅन्सून महाराष्ट्रातही सरासरी तारखेच्या ११ दिवस आधीच महाराष्ट्रात आला.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनची देशातील वाटचाल वेगाने सुरु आहे. माॅन्सून महाराष्ट्रातही सरासरी तारखेच्या ११ दिवस आधीच महाराष्ट्रात आला. माॅन्सूनने आज मुंबई, पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात चाल केली. तर संपूर्ण तमिळनाडू व्यापत बंगळूरसह कर्नाटकच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ३ दिवसांता माॅन्सून राज्याच्या आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सून राज्यात खूप झपाट्याने वाटचाल करत आहे. काल राज्यात धडक दिल्यानंतर माॅन्सूनने आज मुंबईपर्यंत वाटचाल केली. माॅन्सूनने आज मुंबई, पुणे आणि सोलापूरसह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली. तसेच बंगळूरुसह कर्नाटकचा आणखी काही भाग आणि संपूर्ण तमिळनाडू माॅन्सूनने आज व्यापला. 

सोबतच मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालॅंड आणि अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, आसाम आणि आणि मेघालयाच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली. 

माॅन्सूनची सिमा महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर तर कर्नाटकातील कलबुर्गी तसेच तेलंगणातील मेहबुबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावली भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ दिवसांत माॅन्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल.

तसेच कर्नाटकचा उरलेला भागही माॅन्सून व्यापेल. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागरचा उरलेला भाग, ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग, हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमच्या काही भागात माॅन्सून पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT