Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon 2025: मॉन्सून अरबी समुद्रात दाखल

Monsoon Forecast: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) १५ मे रोजी अरबी समुद्रात दाखल झाले असून मालदीव व श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यांवर त्याने मजल मारली आहे. यंदा मॉन्सूनने वेळेआधीच आगमन करत अंदमान, बंगालचा उपसागर आणि कोमोरिन भागात वेगाने प्रगती केली आहे.

अमोल कुटे

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी (ता. १५) अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, २७ मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये पोहोचण्याचे संकेत आहेत.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला.

त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच असून, गुरुवारी (ता. १५) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरिन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टी मॉन्सूनने प्रगती केली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT