Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update: मॉन्सूनची चाल सुरूच; श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापला

Maharashtra Weather Forecast: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेळेआधी दमदार सुरुवात केली आहे. श्रीलंकेचा बराचसा भाग व्यापल्यानंतर आता मॉन्सून लवकरच केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १९) आणखी चाल करत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागारातही आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. शनिवारीपर्यंत (ता. १७) संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूने प्रगती केली आहे.

अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर सोमवारी (ता. १९) मॉन्सूनने चाल सुरूच ठेवली असून, लवकर मॉन्सून देशाच्या मुख्य भूमी असलेल्या केरळमध्ये दाखल होणार आहे.

वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत मालदीव, कोमोरीन उर्वरित भागांसह, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत उद्यापर्यंत (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. २२) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT