Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Update : पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल

Latest Monsoon Update : बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू आहे.

Team Agrowon

Monsoon News Pune : बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू आहे. अरबी समुद्रावरून मात्र मॉन्सूनची आगेकूच मात्र थांबलेली आहे. शुक्रवारी (ता. २३) पूर्व विदर्भाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली असून, पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यातही मॉन्सूनची मोठी प्रगती झाली आहे.

देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यांनतर रविवारी (ता. ११) मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रगती केली आहे. 'बिपॉरजॉय' चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर चाल केल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.

दरम्यान बंगालच्या उपसागरावरून चाल मिळाल्याने गुरूवारी (ता. २२) आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागासह तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागातही मॉन्सून दाखल झाला.

शुक्रवारी (ता. २३) आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग, कर्नाटक, तेलंगणा, झारखंड, बिहारच्या आणखी काही भाग, तसेच पूर्व विदर्भ, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा दक्षिण भारतात रत्नागिरी, विजापूर, निजामाबाद, दूर्ग, दाल्टोनगंज, बक्सर, सिध्दार्थनगर पर्यंत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भाग, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २७) महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT