Rain Alert Agrowon
हवामान

Monsoon Alert : आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

IMD Alert : आज (ता. ७) राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. ७) राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मात्र अंतर्गत ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, बिकानेर, गुणा, मंडला, रायपूर, कलिंगापट्टनम ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

पावसाला पोषक हवामान झाल्याने बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून, ढगाळ हवामानासह उकाडा वाढत आहे. आज (ता. ७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तर विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा

नाशिक, नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT