Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update: दक्षिण श्रीलंकेपर्यंत मॉन्सूनची चाल; माॅन्सूनने अंदमान निकोबार बेट समूह व्यापला

Weather Forecast: मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेट समूह संपूर्ण व्यापल्यामुळे दक्षिण श्रीलंकेपर्यंत त्याची वाटचाल झाली आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस वादळी पाऊस आणि ४०-६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यांची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Anil Jadhao 

Pune News: मॉन्सूनने आज प्रगती करत संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला. तसेच बंगालचा उपसागर तसेच मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागात प्रगत करत माॅन्सूनने श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली. इकडे राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे माॅन्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेच्या आधीच सुरु झाली. माॅन्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीव- भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरिन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर एक दिवस त्याच जागी मुक्काम केला होता.

आज मॉन्सूनने पुढे चाल केली. माॅन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्रात, मारदीव आणि कोमोरीन भागात, बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती केली. तसेच अंदमान आणि निकोबर बेट समूह संपूर्ण व्यापला. माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत माॅन्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी ४० ते ६० किलोमिटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT