Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानातील वाढ कायम राहणार

Weather Forecast : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Pune News : डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी अनुभवायला मिळाली. तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला. मात्र महिन्याच्या अखेरीस राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या वर गेला आहे. शनिवारी (ता. ३०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १३ अंशांच्या वरच आहे. आज (ता. ३१) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.२ (११.९), धुळे ३१.५ (११.०), जळगाव २९.३ (१४.१), कोल्हापूर ३०.१ (१७.०), महाबळेश्वर २९.० (१५.०), नाशिक ३१.७ (१४.२), निफाड ३०.८ (१२.१), सांगली ३०.४ (१५.०), सातारा ३१.९ (१२.४), सोलापूर ३२.६(१६.७), सांताक्रूझ ३४.३ (२०.०), डहाणू ३२.४ (१९.२), रत्नागिरी ३६.०

(१९.७), छत्रपती संभाजीनगर २९.८ (१४.४), नांदेड २९.२ (१६.६), परभणी २९.४ (१५.४), अकोला ३०.६ (१६.३), अमरावती २९.४ (१५.१), बुलडाणा ३०.४ (१५.६), ब्रह्मपुरी ३०.६ (१४.१), चंद्रपूर २८.६ (१४.०), गडचिरोली २९.६ (१४.०), गोंदिया २७.८ (१२.६), नागपूर २८.१(१४.८), वर्धा २८.०(१४.६), वाशीम २९.६ (१४.२), यवतमाळ ३०.२ (१४.५).

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

विषुववृत्तीय हिंदमहासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकताना ही प्रणाली आणखी तीव्र होत तिचे ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर भारतात धुक्याची चादर

शनिवारी (ता. ३०) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागांत किमान तापमान ७ ते १० अंशांच्या दरम्यान होते. उत्तर भारतातील अनेक राज्यात धुक्याची चादर पाहायला मिळत असून, पंजाब हरियानासह काही राज्यांत आज (ता. ३१) थंड दिवस अनुभवायला मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT