Team Agrowon
राज्यातील किमान तापमान काहीशी वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामान किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मागील २४ तासात राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली. तर नलिया येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान ७ ते १० अंश सेल्सियसच्या दरम्यान होतं.
तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील किमान तापमानात वाढ नोंदवली गेली.
तसेच देशातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली होती.