Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Cold Weather Update : ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे राज्यात थंडी ओसरली आहे. राज्यात पावसाने उघडिप दिली असली तरी किमान तापमानातील वाढ कायम आहे. पु

अमोल कुटे

Pune News : ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे राज्यात थंडी ओसरली आहे. राज्यात पावसाने उघडिप दिली असली तरी किमान तापमानातील वाढ कायम आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. देशाच्या सपाट भूभागावर यंदाच्या हंगामात प्रथमच पारा उणे पातळीवर घसरला आहे. गुरूवारी (ता. ११) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ०.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्यात थंडी कमी झाली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २४ अंशांच्या दरम्यान आहे.

अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती विरून जाताच राज्यातील पावसाची परिस्थिती निवळली आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होते. आजपासून (ता. १२) मुख्यतः निरभ्र आकाशासह किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरूवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २५.९ (१७.३), धुळे २८.५ (१३.५), जळगाव २७.२ (१६.१), कोल्हापूर २७.३ (१९.१), महाबळेश्वर २३.१ (१५.०), नाशिक २९.० (१७.८), निफाड २७.८ (१७.१), सांगली २६.५ (१८.७), सातारा २५.२ (१७.४), सोलापूर २९.०(१९.४), सांताक्रूझ ३०.८ (२३.६), डहाणू २८.४ (२०.६), रत्नागिरी ३१.१ (२३.७),

छत्रपती संभाजीनगर २५.६ (१४.६), नांदेड ३०.८ (१९.०), परभणी ३०.२ (१७.५), अकोला २६.८ (१७.०), अमरावती २८.८ (१६.७), बुलढाणा २५.७ (१७.०), ब्रह्मपूरी ३३.० (१८.१), चंद्रपूर ३०.२ (१७.०), गडचिरोली २८.० (१६.४), गोंदिया २९.२ (१५.२), नागपूर ३०.१(१७.४), वर्धा ३१.२(१५.२), वाशीम ३१.२ (१५.२), यवतमाळ ३२.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT