Sunny Weather Agrowon
हवामान

Weather Update : कमाल तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील आठवड्यात झालेल्या गारपीट आणि वादळी पावसानंतर राज्यात आता उन्हाचा चटका वाढू लागलाय. राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पहाटेच्या तापमानाही काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतील गारवाही कमी झाला आहे. तसेच राज्यभर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. 

उत्तर भारतात मागील चोवीस तासात अरुणाचल प्रदेशच्या बहुतांश भागात तर जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझ्झाफराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह हिमवर्षा झाली.

तसेच पुढील तीन दिवसांत उत्तर भारतातील काही भागात पावसाचा आणि हिमवर्षाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात सरासरी तापमानाचा पारा ३४ अंशाच्या पार गेलाय.

तर मागील २४ तासात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहून राज्यातील १ ते २ अंशानं कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT