Heat Wave Agrowon
हवामान

Summer Heat : उन्हाची ताप ठरतेय तापदायक

कमाल तापमान वाढल्याने पारा पुन्हा ४३ अंशांच्या वर गेला आहे. उन्हाची ताप तापदायक ठरत असून, उकाडा देखील असह्य होऊ लागला आहे.

Team Agrowon

Summer Heat Update कमाल तापमान वाढल्याने पारा पुन्हा ४३ अंशांच्या वर गेला आहे. उन्हाची ताप (Heat) तापदायक ठरत असून, उकाडा देखील असह्य होऊ लागला आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा (Rain Forecast) कायम आहे. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची, तर अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव, अमरावती येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.

उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ४२ अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान १९ ते २७ अंशांच्या दरम्यान आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.२ (१९.७), जळगाव ४२.४ (२३.७), कोल्हापूर ३७.७ (२५.०), महाबळेश्वर ३१.१ (१९.९), नाशिक ३९.२(२०.६),

निफाड ४०.१(१९.०), सांगली ३९.१ (२३.२), सातारा ३७.४ (२२.५), सोलापूर ४०.८ (२४.९), सांताक्रूझ ३३.८ (२३.७), डहाणू ३३.४ (२३.९), रत्नागिरी ३४.१ (२६.३),

छत्रपती संभाजीनगर ३९.२ (२४.२), नांदेड ३९.८ (२६.४), परभणी ४१.९ (२५.९), अकोला ४२.८ (२४.१), अमरावती ४२.०(२४.७), बुलढाणा ३९.० (२५.६), ब्रह्मपूरी ४३.१ (२५.५),

चंद्रपूर ४३.२ (२६.२), गडचिरोली ४०.०(२३.४), गोंदिया ४२.८ (२३.२), नागपूर ४०.९ (२३.७), वर्धा ४२.५(२७.४), वाशीम ४१.४ (२४.०), यवतमाळ ४१.५ (२४.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: पावसाने उभ्या पिकांचे नुकसान

Pune Rain Update: खडकवासला परिसरात विक्रमी १०४ मिमी पाऊस

Political Crime Case: आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट

Agriculture Department Crackdown: ‘एचटीबीटी’ रोखण्यासाठी भरारी पथके

Revenue Department Services: महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद

SCROLL FOR NEXT