Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather: कमाल तापमान वाढण्याचा अंदाज

Maharashtra Summer Weather: राज्यात उन्हाचा कहर वाढत असून, सोलापूर आणि अकोल्यात तापमान ४०.५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाचा ताप पुन्हा वाढू लागल्याने कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे. अकोला आणि सोलापुरात ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून (ता. २५) राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा, तसेच दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहून उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला आणि सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि जेऊर येथे तापमान ३९ अंशांच्या वर होते.

धुळे, जळगाव, मालेगाव, सांगली, परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर आणि यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान असून, उकाडा जाणवत आहे. किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहे. आज (ता. २५) राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : ---

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३७.८---१७.७

अहिल्यानगर---३७.०---१६.३

धुळे---३८.५---१४.२

जळगाव---३८.५---निरंक

जेऊर---३९.०---१९.०

कोल्हापूर---३७.४---२२.२

महाबळेश्वर---३२.१---१७.८

मालेगाव---३८.६---१८.८

नाशिक---३७.१---१८.३

निफाड---३७.२---१३.०

सांगली---३८.७---२२.२

सातारा---३७.७---१९.९

सोलापूर---४०.५---२६.७

सांताक्रूझ---३३.८---२३.८

डहाणू---३४.९---२२.२

रत्नागिरी---३२.८---२३.२

छत्रपती संभाजीनगर---३७.४---२०.०

धाराशिव---३७.३---२२.४

परभणी---३८.१---२२.३

परभणी (कृषी)---३८.०---१८.०

अकोला---४०.५---१९.६

अमरावती---३९.२---२२.१

भंडारा---३६.६---२१.०

बुलडाणा---३६.६---२१.८

ब्रह्मपुरी---३८.८---२१.५

चंद्रपूर---३७.८---निरंक

गडचिरोली---३५.६---१८.०

गोंदिया---३५.५---१८.०

नागपूर---३८.०---१८.८

वर्धा---३७.८---२०.२

वाशीम---३७.८---निरंक

यवतमाळ---३८.४---२१.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१८.०---४०.५

मराठवाडा---१८.०---३८.१

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.७---४०.५

उत्तर महाराष्ट्र---१३.०---३८.६

कोकण---२२.२---३४.९

३९ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४०.५, अकोला ४०.५, अमरावती ३९.२, जेऊर ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT