Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या वर पोहोचले आहे. सोलापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही दक्षिणेकडील जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता असून, काही भागांत पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. २२) उन्हाचा चटका कायम राहण्यासह, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. उद्या (ता. २३) तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे.

रायलसीमापासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. देशातील कमाल तापमानात होत असून, शुक्रवारी (ता. २१) कर्नाटकातील कलबुर्गी येथे देशातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३८.१ अंश तापमान नोंदले गेले. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. सांताक्रूझ, सांगली, जेऊर, ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा येथे पारा ३६ अंशांच्या पार होता.

उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा कायम असून, शुक्रवारी (ता. २१) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने, उकाड्यातील वाढीने घाम निघत आहे. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.०---१४.९

अहिल्यानगर---निरंक---१५.४

धुळे---३४.०---११.६

जळगाव---३४.८---निरंक

जेऊर---३६.०---१५.०

कोल्हापूर---३५.२---२०.९

महाबळेश्वर---३०.२---१७.४

मालेगाव---३३.६---१५.६

नाशिक---३४.४---१४.४

निफाड---३२.५---१०.६

सांगली---३७.२---२०.१

सातारा---३४.४---१७.५

सोलापूर---३८.१---२२.०

सांताक्रूझ---३६.३---२०.०

डहाणू---३२.९---२०.४

रत्नागिरी---३४.६---२१.५

छत्रपती संभाजीनगर---३५.०---१८.५

धाराशिव---३५.०---२०.०

परभणी---३५.४---१७.०

परभणी (कृषी)---३४.२---१२.८

अकोला---३६.७---१७.१

अमरावती---३६.४---१५.७

भंडारा---३५.२---१८.०

बुलडाणा---३३.२---१८.०

ब्रह्मपुरी---३७.१---१८.०

चंद्रपूर---३५.६---निरंक

गडचिरोली---३६.०---१६.२

गोंदिया---३४.२---१७.४

नागपूर---३६.६---१६.१

वर्धा---३६.०---१६.८

वाशीम---३५.६---निरंक

यवतमाळ---३६.४---१६.४

रविवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील कमाल तापमानाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

सोलापूर ३८.१, ब्रह्मपुरी ३७.१, अकोला ३६.७, नागपूर ३६.६, अमरावती ३६.४, यवतमाळ ३६.४, सांताक्रूझ ३६.३, सांगली ३७.२, जेऊर ३६, गडचिरोली ३६, वर्धा ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT