Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात थंडी काहीशी वाढली; राज्यातील बहुतांशी भागात पुढील दोन दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज

Maharashtra Winter Season: राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवत होता. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक भागात गारठा पुन्हा वाढला आहे. उत्तर भारतातही गारठ्याचे प्रमाण टिकून आहे. पण राज्यात आकाश निरभ्र राहून, किमान तापमानातील घट कायम राहील. तर दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन थंडी कमी-अधिक होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर भारतात थंडीत चढ उतार कायम आहेत. वायव्य उत्तर प्रदेशापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. आज मध्य प्रदेशातील मांडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली आल्याचे दिसत आहे. आज निफाडे तेथील गहू संशोधन केंद्रात ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्याच्या इतर भागातही थंडीचा कडाका काहीसा वाढला होता. तसेच राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादरही पहायला मिळत आहे. ढगाळ हवामान निवळताच किमान तापमानाचा पारा घसरला आहे. दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला.

राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी कमी जास्त होत आहे. ढगाळ हवामानाचा परिणाम राज्यातील तापमानावर दिसून आला. आज मात्र थंडीचा कडाका बहुतांशी भागात जास्त होता. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानात आणखी वाढ होऊन थंडी कमी जास्त होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT