Cyclone Agrowon
हवामान

Cyclone : संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही

Cyclone Update : हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून बुधवारपर्यंत (ता. २३) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

बंगालच्या उपसागराच्या उत्तर अंदमान समुद्रामध्ये सोमवारी (ता. २१) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने उद्या (ता. २३) पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

गुरुवारी (ता. २४) ही वादळी प्रणाली ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यातच पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, भारताच्या किनाऱ्यापासून दूर जाणारी ही प्रणाली निवळू लागली आहे.

हवामान विभागातील निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, की बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिमेला कमी दाबाची प्रणाली तयार होणार आहे. त्यानंतर ती वायव्येकडे सरकत ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत येणार आहे.

जमिनीवर आल्यानंतर ही वादळी प्रणाली बांगलादेशकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव पडणार नसल्याने महाराष्ट्राला धोका नाही. परिणामी राज्यात कोणतीही हानी होणार नाही.

दोन दिवस पाऊस कायम राहणार

राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस दोन दिवस कायम राहणार असून, बुधवारपासून (ता. २३) ढगाळ वातावरणासह किरकोळ पाऊस होईल. त्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची मुख्यतः उघडीप राहील.

बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. या ईशान्य, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह किरकोळ पाऊस राहील. या पावसाने नुकसान होणार नसल्याचे श्री. खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT