Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Temperature: उन्हाचा कहर! महाराष्ट्रात तापमान ३७ अंशांच्या घरात, उष्णतेची लाट येणार?

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढू लागला असून, सोलापूरने उच्चांकी ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. निफाड येथे किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने राज्यात तीव्र थंडी आणि उन्हाचा तडाखा एकाच वेळी जाणवतो आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने पस्तिशीपार असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश, तर निफाड येथे नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० ते १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. गुरुवारी (ता. १३) राजस्थानच्या फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंशांच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरसह परभणी, पुणे, जेऊर आणि वाशीम येथे ३६ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. सातारा, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे पारा पस्तिशीपार आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात तब्बल ८ ते २५ अंशांची तफावत दिसून येत आहे. आज (ता. १४) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.०---१२.३

अहिल्यानगर---३३.२---१३.७

धुळे---३३.०---१२.५

जळगाव---३२.६---निरंक

जेऊर---३६.०---१४.५

कोल्हापूर---३४.५---२०.१

महाबळेश्वर---३०.३---१६.८

मालेगाव---३२.०---निरंक

नाशिक---३४.१---१२.१

निफाड---३१.८---७.२

सांगली---३४.६---१६.६

सातारा---३५.६---१५.५

सोलापूर---३७.३---२०.६

सांताक्रूझ---३२.९---१६.५

डहाणू---२८.८---२०.५

रत्नागिरी---३४.२---१९.६

छत्रपती संभाजीनगर---३४.६---१५.५

धाराशिव---३३.८---१८.२

परभणी---३६.३---१६.३

परभणी (कृषी)---३४.७---११.५

अकोला---३५.५---१५.७

अमरावती---३५.२---१५.१

भंडारा---३४.०---१७.०

बुलडाणा---३२.३---१७.०

ब्रह्मपुरी---३५.२---१६.६

चंद्रपूर---३५.८---निरंक

गडचिरोली---३५.२---१७.०

गोंदिया---३३.२---१७.५

नागपूर---३५.१---१७.०

वर्धा---३५.०---१६.८

वाशीम---३६.०---१८.६

यवतमाळ---३४.४---१५.०

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३७.३, परभणी ३६.३, पुणे ३६, जेऊर ३६, वाशीम ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT