Maharashtra Winter Weather Agrowon
हवामान

Weather Update: तापमानातील चढ-उतार कायम राहणार

Weather Forecast: राज्यात थंडीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात थंडीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ९) कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. वायव्य भारतात थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून, शनिवारी (ता. ८) पश्चिम मध्य प्रदेशातील येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्यात थंडी कमी झाली असून, कमाल तापमानात देखील चढ-उतार होत आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी आणि जेऊर येथे तापमान ३५ अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. आज (ता. ९) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४---१६.४

अहिल्यानगर---३४---१७.६

धुळे---२९.५---१०.५

जळगाव---निरंक---१४.८

जेऊर---३५.५---१६.५

कोल्हापूर---३३.२---१९.६

महाबळेश्वर---२९.१---१७.१

मालेगाव---२९.२---१६

नाशिक---३१.३---१५.५

निफाड---३०---१३.३

सांगली---३४.४---१८.३

सातारा---३३.७---१७.१

सोलापूर---३६---२१.९

सांताक्रूझ---३३.९---२०.५

डहाणू---२९.३---१८.३

रत्नागिरी---३५.७---१९.८

छत्रपती संभाजीनगर---३२.४---१८.२

धाराशिव---निरंक---१८.१

परभणी---३३.९---१७.९

परभणी (कृषी)---३३.२---१६.१

अकोला---३२.९---१८.२

अमरावती---३१.८---१५.५

भंडारा---२९.२---१५

बुलडाणा---३०.५---१७.८

ब्रह्मपुरी---३२.२---१५.९

चंद्रपूर---३२.४---निरंक

गडचिरोली---३१.६---१५

गोंदिया---२८.२---१६.३

नागपूर---३०.४---१६.३

वर्धा---३१---१७

वाशीम---३४.२---२१

यवतमाळ---३०.६---१५

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३६, रत्नागिरी ३५.७, जेऊर ३५.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT