Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Update : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी

Latest Rain Update : राज्यात मॉन्सून दाखल होण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यापूर्वी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ४) हवेली, मुळशी, मावळ, खेड, भोर, पुरंदर, बारामती भागात पावसाच्या हलक्या सरी पडला.

Team Agrowon

Pune Weather News : राज्यात मॉन्सून दाखल होण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यापूर्वी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ४) हवेली, मुळशी, मावळ, खेड, भोर, पुरंदर, बारामती भागात पावसाच्या हलक्या सरी पडला. पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला असून खरिपासाठी हा पाऊस पोषक असल्याचे मानले जात आहे.

गेले दोन दिवस उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे उकाड्यात काहीशी वाढ झाली होती. मात्र, रविवारी सकाळपासून हवामानात काही अंशी बदल झाला होता. ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. परंतु दुपारी दोन वाजेनंतर हवामानात अचानक बदल झाला.

काळेकुट्ट ढग भरून आल्याने जोरदार वाऱ्यासह कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला. मावळ भागातील अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. खेडमध्येही आळंदी, चिंचवड, भोसरी भागात हलक्या सरी कोसळल्या.

हवेली तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात पावसाच्या दमदार सरी पडल्या असून पुणे स्टेशन भागात जोरदार पाऊस पडला. तर उपनगरातील हडपसर, भेकराईनगर, रेसकोर्स, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, लोणी काळभोर भागात जोरदार पाऊस बरसला.

तर सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शिवाजीनगर भागात ०.८ मिलिमीटर, चिंचवड भागात ६.५, पाषाण भागात १२.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर बारामती भागात अचानक धूळ वादळ वाहिल्याने काही मिनिटात शहरावर काळोख सदृश परिस्थिती तयार झाली होती.

तालुक्यातील अनेक गावात हे वादळ वाहिल्याने धुळीच्या कणांनी सर्व परिसर झाकला गेला होता. हा पाऊस खरीप हंगामासाठी योग्य असला तरी सर्वदूर पाऊस झाल्यास खरिपाच्या पेरण्यांना नक्कीच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT