Rain Agrowon
हवामान

Weather Maharashtra : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज; विविध जिल्ह्यात हलक्या सरीची शक्यता

Maharashtra Weather Forecast : उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान झालं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

त्यामुळे पुढील २ ते ३ दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे.उद्या म्हणजेच गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर मराठवड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यासह पुणे रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवड्यातील शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा. तसेच मेघगर्जना आणि वीजांचा कडकडाट लक्षात घेता, जनावरांना या कालावधीत गोठ्यात बांधावं, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यात नाशिक येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सियसची नोंद झाली. तर देशात पूर्व मध्य प्रदेशातील सिधी इथे नीचांकी ११.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनाऱ्यावरील ठळक दाब क्षेत्र अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. तर हवेचा कमी दाब पट्टा केरळच्या किनारपट्टीवर सक्रीय आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT