Monsoon Agrowon
हवामान

IMD Monsoon Forecast: मॉन्सूनच्या आगमनाचा सांगावा

Monsoon Update: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम वेळेपेक्षा आधी सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याचा अंदाज असून यामुळे केरळ आणि महाराष्ट्रात लवकर पावसाची आशा बळावली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचा सांगावा आला आहे. अंदमान-निकोबार बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. मंगळवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनचे अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातील लवकर आगमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणतः २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १३ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी डेरे दाखल झालेला मॉन्सून ६ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पोहोचला होता.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरी वर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) सध्या तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात हे दोन्ही घटक तटस्थ राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे.

मॉन्सूनचे अंदमानातील आगमन

वर्ष--तारीख

२०२०---१७ मे

२०२१---२१ मे

२०२२---१६ मे

२०२३---१९ मे

२०२४---१९ मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT