Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Update: मराठवाड्यात ५ दिवस कमीच पाऊस; विदर्भात २ दिवसांनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Rain Forecast: राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला असून, मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र विदर्भात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. तर माॅन्सूनची प्रगतील आज झाली नाही. माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस या भागातील पाऊस कायम राहील, असा अंदाज दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर तसेच खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज दिला. विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवारपासून पुढील ३ दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. माॅन्सून आज कालच्याच भागात होता. माॅन्सूनची सिमा जयपूर, आग्रा, रामपूर, डेहरादून, शिमला आणि मनाली भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. पुढील २ दिवसांत माॅन्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे.

तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशचा आणखी काही भाग, जम्मू-काश्मिर-गिलगीट-बाल्टीस्थान-मुझफ्फराबाद आणि लडाखच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मिर, पंजाब,हरियाना, चंदीगड आणि दल्लीच्या काही भागातही माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Subsidy: ट्रॅक्टरसाठी १.२५ लाख अनुदान, कृषी यांत्रिकीकरणासाठी आणखी २१८ कोटी निधी

Labour Rates : भात आवणीसाठी मजुरांना आला भाव

Urea Shortage : युरिया खताचा तुटवडा तातडीने दूर करा; सक्तीची विक्री थांबवा

Solapur Silk Market : राज्यातील चौथ्या रेशीम बाजारपेठेचा सोलापुरात प्रारंभ

Modern Machines: दोन ओळी आणि दोन फळझाडांमधील तण काढणारे आधुनिक यंत्र, राहुरी विद्यापीठाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT