Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी

Rain Update : विदर्भातील यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

Team Agrowon

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर ठाणे, रायगड जिल्ह्यांत हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भातील यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

सिंधुदुर्गमधील आबोली मंडलात ७३.८, कणकवली ७२, फोंडा ७०.५ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरीतील पुनस मंडलात ६९.३ मिलिमीटर पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील पडघा ५२.५, रायगडमधील चानेरा ५३.३ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ६४.३ मिलिमीटर पाऊस पडला.

साताऱ्यातील महाबळेश्‍वर मंडलात ७०.८, मिलिमीटर, कोल्हापुरातील आंबा ६६.३, बांबवडे ६० मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली भागात उघडीप होती. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण होते. यवतमाळमधील मालखेड मंडलात ७१.० मिलिमीटर पाऊस पडला.

गुरुवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत कृषी विभाग)

कोकण : वाकवली ५०.५, पालगड ५४.५, वेळवी ४९.०, भरणे ५१, आबलोली ५४.५, देवळे ५०.८, लांजा ५४.५, विलवडे ५०.३, बांदा ६२, सांगवे ५७, भेडशी ५२.५.

विदर्भ : यवतमाळ ४५.८, कोपरा ३१, हिवरी २५.५, लोहारा ४७, वणी ४१, सावर ५९.५, दिग्रज ४६.५, सिंगड ४२.५, नेर ५६.८, मालखेड ७१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT