Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचे संकेत; कोकण, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज 

Weather Update : हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज दिला. पण राज्यात सर्वदूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते, अशी शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आज संपूर्ण देश व्यापला आहे. तर देशातील अनेक भागात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज दिला. पण राज्यात सर्वदूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते, अशी शक्यता आहे. 

माॅन्सूनने आज राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापत संपूर्ण देश व्यापला. माॅन्सूनने सरासरी तारखेच्या ६ दिवस आधीच देश व्यापला. माॅन्सून ट्रफ फिरोजपूर, रोहतक, हरदोल, बल्लीया, बलूरघाट, कैलाशहर आणि तिथून पूर्वकडे मनिपूरकडे आहे. पण अजूनही बहुतांशी भागात माॅन्सून म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही.  

राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवस हलका, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या कोकण तेसच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, खानदेशातील नंदूरबार आणि विदर्भातील बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील.

उद्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक, विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा, कोकण आणि खानेदशातील इतर भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरीचाही अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Grape Farmer Support: पोलिसांच्या दणक्याने द्राक्ष शेतकऱ्यांचे ६५ लाख परत

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

SCROLL FOR NEXT