Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : ऊन वाढल्याने वाहू लागल्या घामाच्या धारा

Monsoon Return Journey : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’ वाढत आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, कमाल तापमानात वाढ होत घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

Team Agrowon

Weather Update Pune : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’ वाढत आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, कमाल तापमानात वाढ होत घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ८) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, या भागात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मणिपूरपासून पूर्व बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका वाढत आहे.

शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या पुढे होते. अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती आणि सोलापूर येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. आज (ता. ८) राज्यात मुख्यतः कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.६, जळगाव ३३.६, कोल्हापूर ३१.६, महाबळेश्वर २७.२, नाशिक ३१.१, सांगली ३३.०, सातारा ३३.०, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३२.०, डहाणू ३२.९, रत्नागिरी ३१.४, छत्रपती संभाजीनगर ३३.५, परभणी ३४.८, अकोला ३५.१, अमरावती ३५.०, बुलडाणा ३२.२, ब्रह्मपुरी ३५.०, चंद्रपूर ३४.६, गडचिरोली ३४.४, गोंदिया ३३.८, नागपूर ३४.९, वर्धा ३५.५, वाशीम ३४.२, यवतमाळ ३३.७.

मॉन्सूनची माघार शक्य

मॉन्सूनने जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागासह पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशसह, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

वर्धा ३५.५, सोलापूर ३५.२, अकोला ३५.१, अमरावती ३५.०, ब्रह्मपुरी ३५.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT