Weather  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात वाढ; गारठा कायम

Weather Forecast : मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात वाढ झाली असली, तरी गारठा कायम आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. २१) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. २०) मध्य प्रदेशातील नवगाव यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, सिक्कीम, मध्य प्रदेशमध्ये किमान तापमान ६ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १९ अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.१ (१३.४), नगर २९.८ (१४.४), धुळे २८ (१०), जळगाव २८.८ (११), कोल्हापूर २९.६ (१७.५), महाबळेश्‍वर २४.८ (१४), नाशिक २९.३ (१२.७), निफाड २८.२ (११), सांगली ३०.३ (१८.१), सातारा ३०.८ (१४.६), सोलापूर ३३.८ (१८.६), सांताक्रूझ २८.८ (१७.९), डहाणू २८.६ (१६.९), रत्नागिरी ३० (२०.४), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१४.४), नांदेड ३०.८ (१८.६), परभणी ३१.४ (१७), अकोला ३०.२ (१७.४), अमरावती ३० (१५.७), बुलढाणा २९.४ (१५.७), ब्रह्मपुरी ३१.७ (१७.५), चंद्रपूर ३० (१५.४), गडचिरोली ३० (१६.४), गोंदिया २६ (१४.०), नागपूर २८.२ (१७.२), वर्धा २८.२ (१६.६), वाशीम ३१.२ (१५.४), यवतमाळ ३१.५ (१६.३).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT