Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : मराठवाड्यात पाऊस कसा राहील? कोकण, विदर्भातील काही भागात जोरदार सरींचा अंदाज

Marathwada Weather Update : जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊसमान कसे राहू शकते? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.

Anil Jadhao 

Pune News : जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊसमान कसे राहू शकते? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. राज्यात पावसाची संमिश्र स्थिती राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यांनी विभागनिहाय पावसाचा अंदाज दिला. 

मराठवाड्यात पुढील ३ दिवस पाऊस कसा राहू शकतो? यावर बोलताना माणिकराव खुळे म्हणाले की, मराठवाड्यात कही भागात धूळ पेरणी तर काही भागात पुरेशा ओलीवरील पेरण्या झाल्या.

या पिकांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. गुरुवारपर्यंत पावसाच्या सध्य:स्थितीत विशेष काही बदल दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते, असे खुळे यांनी सांगितले. 

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात चांगला पाऊस (Rain) पडू शकतो, असा अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, खानदेशपासून सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये जून शेवटच्या आठवड्यात, भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली.

परंतु खरीप पेरणीची स्थिती येथेही समाधानकारक नाही. जोरदार पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. गुरुवारपर्यंत या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खानदेशातील ३ जिल्हे व पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही, असे खुळे यांनी सांगितले. 

कोकण आणि विदर्भातील पावसाच्या अंदाजविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार तर विदर्भात पूर्वानुमनानुसार मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

विदर्भातील पेरणी झालेल्या पिकांना जीवदान तर नापेर क्षेत्रात पेरणीसाठी ह्या पावसाने मदत होऊ शकते, असे वाटते. गुरुवारपर्यंत पावसाची स्थिती अशीच म्हणजे कोकणात अति-जोरदार तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया,  गडचिरोली व चंद्रपूर मध्ये अति जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही, असाही अंदाज श्री. खुळे यांनी दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT