Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा इशारा कायम

IMD Warning: राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर मध्य महाराष्ट्रापासून मराठवाडा, कर्नाटक, रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ आकाश होत असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानच्या बिकानेर येथे देशातील उच्चांकी ४५.१ अंश तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे ४३ अंश, तर जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती आणि वाशीम येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १९) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे.

शुक्रवारी (ता. १८) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---४०.३---२१.६

अहिल्यानगर---निरंक---२१.५

धुळे---४३.५---२०.०

जळगाव---४२.७---२६.०

जेऊर---४२.५---२२.०

कोल्हापूर---३७.१---२३.६

महाबळेश्‍वर---३२.७---२०.३

मालेगाव---४२.२---२५.०

नाशिक---३९.४---२०.७

निफाड---४०.५---१९.९

सांगली---३८.३---२३.७

सातारा---४०.७---२१.६

सोलापूर---४२.८---२५.९

सांताक्रूझ---३२.८---२४.५

डहाणू---३५.०---२४.३

रत्नागिरी---३२.०---२५.५

छत्रपती संभाजीनगर---४२.४---२६.९

धाराशिव---४०.५---निरंक

परभणी---४२.१---२६.८

परभणी (कृषी)---४१.०---२३.८

अकोला---४४.१---२८.४

अमरावती---४२.६---२५.५

भंडारा---३८.२---२६.४

बुलडाणा---४०.७---२७.४

चंद्रपूर---४३.०---निरंक

गडचिरोली---४०.४---२४.०

गोंदिया---३९.१---२४.८

नागपूर---४१.१---२५.४

वर्धा---४१.५---२५.५

वाशीम---४२.६---निरंक

यवतमाळ---४३.४---२८.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२४.०---४४.१

मराठवाडा---२३.८---४२.४

पश्‍चिम महाराष्ट्र---२०.३---४२.८

उत्तर महाराष्ट्र---२०.०---४३.५

कोकण---२४.३---३५.०

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.

४३ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४४.१, धुळे ४३.५, यवतमाळ ४३.४, चंद्रपूर ४३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT