Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Heatwave Alert: राज्यात उन्हाचा चटका वाढत असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्यामुळे ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाला पोषक हवामान असले तरी राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने तसेच विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य प्रदेश, मराठवाडा, कर्नाटक, रायलसीमा तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर, चंद्रपूर, धुळे, यवतमाळ आणि जेऊर येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशीम येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा आणि झळा तापदायक ठरत आहेत.

आज (ता. १७) विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---४०.८---१९.३

अहिल्यानगर---४०.८---२०.४

धुळे---४२.४---१९.८

जळगाव---४१.८---२५.८

जेऊर---४२.०---२१.०

कोल्हापूर---३९.६---२३.५

महाबळेश्वर---३३.४---२१.४

मालेगाव---४१.८---२५.०

नाशिक---३९.१---२०.८

निफाड---३९.०---१७.४

सांगली---४०.७---२३.६

सातारा---४०.३---२२.०

सोलापूर---४२.८---२७.०

सांताक्रूझ---३६.२---२४.१

डहाणू---३५.०---२३.७

रत्नागिरी---३४.२---२३.५

छत्रपती संभाजीनगर---४१.५---२५.५

धाराशिव---४०.८---२४.०

परभणी---४१.८---२६.५

परभणी (कृषी)---३९.०---१७.४

अकोला---४३.७---२८.१

अमरावती---४१.६---२४.५

भंडारा---३९.४---२३.०

बुलडाणा---३९.६---२८.०

चंद्रपूर---४२.६---निरंक

गडचिरोली---४०.०---२२.४

गोंदिया---३९.२---२१.८

नागपूर---४१.४---२४.३

वर्धा---४१.५---२४.४

वाशीम---४१.२---निरंक

यवतमाळ---४२.२---२६.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२१.८---४३.७

मराठवाडा---१७.४---४१.८

पश्‍चिम महाराष्ट्र---१९.३---४२.८

उत्तर महाराष्ट्र---१७.४---४२.५

कोकण---२३.५---३६.२

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सोलापूर, धाराशीव.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३.७, सोलापूर ४२.८, चंद्रपूर ४२.६, धुळे ४२.४, यवतमाळ ४२.२, जेऊर ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT