Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Summer Heat : राज्यात वादळी पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News : राज्यात वादळी पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३०) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.

पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत असून, उकाडा देखील वाढला आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानात वाढ झाल्याने परभणी, नांदेड, जळगाव, मालेगाव येथे पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार आहे. आज (ता. ३०) मुंबई, ठाणे, रायगड येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा टिकून राहणार आहे.

सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४१.३, धुळे ४१.०, जळगाव ४२.२, कोल्हापूर ४०.२, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२.०, नाशिक ४१.२, निफाड ४०.०, सांगली ४१.०, सातारा ४०.५, सोलापूर ४३.७, सांताक्रूझ ३८.१, डहाणू ३५.०, रत्नागिरी ३४.०,

छत्रपती संभाजीनगर ४०.७, नांदेड ४२.४, परभणी ४२.८, अकोला ४१.३, अमरावती ३९.२, बुलडाणा ३९.१, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४१.८, गडचिरोली ४१.६, गोंदिया ३३.८, नागपूर ३७.४, वर्धा ३९.०, वाशीम ४१.८, यवतमाळ ४१.५.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४३.७, परभणी ४२.८, नांदेड ४२.४, जळगाव ४२.२, मालेगाव ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT