Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाडा, विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले

Maharashtra Monsoon Update : नद्यांना पूर, घाटमाथ्यावरही जोर कायम

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Monsoon 2023 Update: पुणे : कोकणासह (Konkan) घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे.

तर विदर्भातील यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार (Heavy Rain) सरी पडल्या.

बुधवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीतील रामेश्‍वर येथे सर्वाधिक २४० मिलिमीटर, देवगड येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मालवण आणि कुडाळ येथेही १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विदर्भातील यवतमाळ येथे १५० मिलिमीटर, तर मराठवाड्यातील परभणी येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गडनदी, जानवली, कर्ली, तिलारी, शुक नदी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर व लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला.

जालना, बीड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस झाला आहे. उगवलेल्या पिकांना तूर्त जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मंगळवारी (ता. ४) समाधानकारक सुरुवात केली.

किनवट आणि माहूर तालुक्यात जोरदार झाला. किनवटमधील दोन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भात पावसाला सुरू असून, गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. महागाव तालुक्‍यात वाहून गेलेल्या दोनपैकी एका युवकाचा मृत्यू झाला.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागात शेतीकामांना गती आली आहे. मात्र पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मंगळवारी (ता. ४) मालेगाव व देवळा तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली.


१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची मंडले
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यात पडेल येथे २७० मिलिमीटर, देवगड येथे २१७, शिरगाव १७८, पाटगाव १२३, बापर्डे १८७, मालवण १४१.५, पेंडूर १५०, श्रावण १०६.८, अंबेरी १४१, पोयीप १०६.८, आजगाव १०८, मदुरा ९७.५ वेंगुर्ला ११३, म्हापण १२०.३, नांदगाव ११५, कुडाळ ११२.८, वळवण १२० मिलिमीटर पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

तसेच मराठवाड्यातील बोरोळ येथे १३२.५ मिलिमीटर, तर इस्लापूर ११३.५, परभणी ११३.८ मिलिमीटर पाऊस पडला; तर देहली ९९.८, तसेच विदर्भातील कोळंबी येथे १४७.८ मिलिमीटर पाऊस पडला; तर मोहा १३२, कागाव १२५.३, तुपटाकळी १२५.३, लोनबेहल १११.५, पोहा ११०.३, यवतमाळ १००.५, अकोलबाजार ९१. (स्रोत कृषी विभाग)

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; पूरस्थितीची शक्यता
- मराठवाड्यात पावसाला जोरदार हजेरी
- नाशिकमध्ये दमदार, शिवारात साचले पाणी
- पावसाच्या हजेरीने पिकांना जीवदान
- खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT