Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon 2025: जोरदार पावसाचा राज्यात अंदाज; विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस येलो अलर्ट

Heavy Rain Forecast: माॅन्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रगती केली. तर राज्यातील अनेक आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु झाला होता.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रगती केली. तर राज्यातील अनेक आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु झाला होता. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. पालघर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता. तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज होता.

पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावासचा येलो अलर्ट देण्यात आला होता.

विदर्भ आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रील इतर भागात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली.

माॅन्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रगती केली. मात्र अरबी समुद्रातील शाखा कालच्याच भागात होती. माॅन्सूनची सिमा आजही बारमेर, जोधपूर, जयपूर, ग्वालियर, खजुराहो, सोनभद्रा आणि बल्लीया भागात होती. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.

त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश आणि बिहारचा उरलेला भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर-लाख-गिलगीट-बाल्टीस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात माॅन्सून पोचेल. तसेच पंजाब आणि हरियानाच्या काही भागात माॅन्सून दाखल होण्यासही अनुकूल स्थिती आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT